शहरात दिवसेंदिवस महिला , तरुणी व अल्पवयीन मुलींवरील ( minor girl) अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रेमाचे नाटक करत अल्पवयीन मुलीला प्रियकराने लुटले . ही घटना ताजी घटना ताजी असताना आज एकतर्फी प्रेमातून तरुणाने इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर धारदार हत्याराने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. घटनेनंतर मुलीला रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर सिटी हॉस्पिटल वडगाव शेरी याठिकाणी उपचार सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडगाव शेरी येथे ही घटना घडली आहे. या घटनेत मुलीच्या पोटाला, हाताला गंभीर जखमा झाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शास्त्रीनगर पोलीस करत आहेत. दुसरीकडे पुणे शहरात एका तरुणाने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत मुलीशी जवळीक साधत तिची फसवणूक केली आहे. मुलीसोबत प्रेमाचे नाटक करत तरुणानं तुझ्या माझ्या लफड्याविषयी दोघांच्या घरी सांगेन असे म्हणत तिला ब्लॅकमेल केले. यावरून मुलीला लुटल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकानरणी 19 वर्षीय तरुणावर सिंहगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ऋत्विक अशोक दिघे (वय 19, रा. दत्तनगर, कात्रज) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत आनंदनगर येथील 17 वर्षीय तरुणीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ही घटना 2019 ते मार्च2022 र्यंत सुरु असल्याची माहिती दिली आहे.