Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीमहागाईच्या मुद्द्यावरुन सुप्रिया सुळेंचा केंद्रावर निशाणा

महागाईच्या मुद्द्यावरुन सुप्रिया सुळेंचा केंद्रावर निशाणा

कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतेय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यानं पेट्रोल-डिझेलच्या दरातही मोठी वाझ होण्याची शक्यता आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान महागाईच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. देशात 2018 ते 2021 या काळात प्रचंड महागाई वाढली असून गरिबांनी जगायचं कसं? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केलाय. वाणिज्य मंत्रालयानुसार नोव्हेंबर 2021 मध्ये ‘घाऊक किंमत निर्देशांक’ गेल्या वर्षीच्या तुलनेत 14.23 टक्के वाढला असल्याचा मुद्दा सुळे यांनी उपस्थित केला.

लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान बोलताना देशांतर्गत वाढलेली महागाई आणि त्याचा सर्वसामान्य जनतेवर झालेल्या दुष्परिणामाचा मुद्दा मांडला. वाणिज्य मंत्रालयानुसार नोव्हेंबर 2021 मध्ये ‘घाऊक किंमत निर्देशांक’ गेल्या वर्षीच्या तुलनेत 14.23 टक्के वाढला. इंधन आणि अन्नपदार्थांच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे ही स्थिती उद्धवली आहे. केंद्र सरकार गत 2020 पासून अतिशय वेगाने पेट्रोल, डिझेल आदी इंधनाच्या किंमती वाढवित आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी शंभरी ओलांडली असून स्वयंपाकाचा सिलिंडर देखील 850 रुपयांच्या पुढे गेला आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2018 ते 2021 दरम्यान सूर्यफुलाच्या तेलाच्या किंमती सुमारे 65.7 टक्क्यांनी वाढल्या आहेत तर पामतेल 61.9 टक्क्यांनी वाढले आहे. डाळींच्या किंमतीत देखील कमालीची वाढ नोंदविण्यात आली आहे. मुग डाळींच्या किंमती 44.7 टक्क्यांनी, उडीद डाळींच्या किंमती 54.3 टक्क्यांनी, तुर डाळीच्या किंमती 49.8 टक्क्यांनी, मसूर डाळीच्या किंमती 35.9 टक्क्यांनी वाढल्या आहेत. कांद्याच्या दरात देखील 30.3 टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे’.

केंद्र सरकार पेट्रोलवर प्रतीलीटर 32.90 रुपयांचे तर डिझेलवर प्रतीलीटर 31.80 रुपयांचे उत्पादन शुल्क आकारत आहे. तब्बल 65 टक्क्यांचा कृषीसेस,रस्ता आणि पायाभूत सुविधा सेस देखील लावण्यात आली आहे. सर्वसामान्य जनता कोविडच्या काळात भरडून निघाली आहे. तरीही केंद्र सरकार दैनंदिन वापरातील पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅस यांसारख्या वस्तुंवर सेस व लेव्ही आकारत आहेत. कॅगच्या अहवालात हे नमूद आहे. या सरकारला नम्र विनंती आहे की, कृपया या सेस आणि करांमध्ये तातडीने कपात करावी. जीवनावश्यक वस्तुंचे दर स्थिर ठेवून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केंद्राकडे केलीय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -