Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंगMaggi च्या चाहत्यांना झटका, अनेकांची आवडती मॅगी इतक्या रुपयांनी महागली

Maggi च्या चाहत्यांना झटका, अनेकांची आवडती मॅगी इतक्या रुपयांनी महागली

मार्च महिन्यात अनेक वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. ज्याचा सरळ परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला दूध, कर्मशिअल सिलेंडर महागलं आहे. त्यातच आता मॅगीची किंमत ही वाढली आहे. अनेकांसाठी अडचणीच्या वेळी झटपट भूक भागवणारी मागी आता 14 रुपयांना मिळणार आहे. Maggi चं उत्पादन करणारी कंपनी Nestle ने 12 रुपयांना मिळणाऱ्या मॅगीच्या पाकिटाची किंमत आता 14 रुपये केली आहे. त्यामुळे ही बातमी अनेकांसाठी बॅडन्यूज ठरली आहे.

कंपनीने चहा, कॉफी आणि दुधाच्या दरात ही वाढ केली आहे. Hinustan Unilever ने देखील अनेक उत्पादनांच्या किंमती वाढवल्या आहेत. खर्च वाढल्याने किंमती वाढवल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

Nestle India ने मॅगी नूडल्स च्या किंमतीत 9 ते 16 टक्क्यांची वाढ केलीये. त्यामुळे 70 gm ची मॅगी आता 12 ऐवजी 14 रुपयांनी मिळणार आहे. Maggi Masala Noodles ची 140 ग्रॅमची तीन रुपयांनी महागली आहे. 560 ग्रॅमची पाकिट 96 ऐवजी 105 रुपयांना मिळणार आहे.

Nestle ने A+milk 1 लीटरच्या कार्टन पॅकच्या दरात 3 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे त्याची किंमत आता 75 वरुन 78 रुपये झाली आहे.

Nescafe Classic 25 ग्रॅम पॅक आता 2.5 टक्क्यांनी वाढून 78 वरुन 80 रुपयांवर पोहोचली आहे. कंपनी ने Nescafe Classic 50 ग्रॅम पॅकच्या किंमतीत वाढ केली आहे. जी आता 150 रुपयांनी मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -