Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीफडणवीसांचे सरकार आणा, वीज तोडणीच्या संकटातून कायमचे मुक्त व्हा’, माजी ऊर्जामंत्र्यांचं शेतकऱ्यांना...

फडणवीसांचे सरकार आणा, वीज तोडणीच्या संकटातून कायमचे मुक्त व्हा’, माजी ऊर्जामंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन

‘ऊर्जा मंत्रालयाने महाराष्टातील शेतकऱ्यांचे पुढील 3 वर्ष वीज कनेक्शन कापू नये, अशी आमची मागणी होती. पण महाविकास आघाडीने लबाडी केली. पुढील तीन महिने वीज तोडण्याची कारवाई थांबविण्याचा निर्णय घेतला. हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. वीज तोडणीच्या संकटातून कायमचे मुक्त व्हायचे असेल तर महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र फडणवीसांचे सरकार आणावे लागेल’, असं आवाहन माजी ऊर्जामंत्री आणि भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना केलंय. विधान सभेत ऊर्जा मंत्र्यांनी वीज तोडणीच्या मोहिमेला तीन महिन्यांसाठी ब्रेक लावला. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

देवेंद्र फडणवीस सरकारने कधीही शेतकऱ्यांची वीज कापण्याचा विचार केला नव्हता. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार आले आणि दुर्दैवाने वीज तोडणी मोहीम राबविण्यात आली. आमच्या काळात 4 हजार 715 कोटींच्या नफ्यात असलेल्या विद्युत निर्मिती कंपन्या आज अंतर्गत भ्रष्टाचारामुळे डबघाईस आल्या आहेत. हा तोटा गरीब शेतकऱ्यांच्या खिशातून वसूल करण्यात येतो आहे. खरं बघता शेतकऱ्यांकडून वसुली करण्याचा अधिकार महाविकास आघाडीला नाही. तरीही वीज तोडणीची मोहीम सुरू असल्याची घणाघाती टीका बावनकुळे यांनी केलीय.

बावनकुळे म्हणाले की, राज्याच्या शेतकऱ्यांच्या बिलात मोठ्या प्रमाणात चुका आहेत. हे लक्षात येताच गरीब शेतकऱ्यांची वीज तोडणी करायची नाही असे ठरवलं गेलं. वीज भलतीकडेच वापरली जाते आणि त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना भरावा लागतो. एकप्रकारे हा शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापू नका, ही मोहीम तीन महिने नाही तर कायमची थांबवा. विद्युत निर्मिती प्रकल्प नफ्यात आणायचे असल्यास अंतर्गत भष्टाचारास आळा घाला, असे आवाहनही बावनकुळे यांनी केलं. राज्याच्या विकासासाठी शेतकऱ्याची भूमिका मोलाची ठरणार असल्याचंही ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -