होळी हा रंगाचा उत्सव आहे. राज्यभरात उद्या म्हणजेच 17 मार्च रोजी होळीचा सण साजरा करण्यात येणार आहे. होळी आणि धुलिवंदन साजरी करण्यासाठी सर्वत्र तयारी केली जात असताना राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल केले असले तरी होळी आणि धुलिवंदनसाठी नवे नियम पाळावेच लागतील, असे निर्देश गृहमंत्रालयाने दिले आहेत. नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
राज्य सरकारने जारी केलेल्या निर्देशानुसार, कोरोना व्हायरसचा पूर्णपणे नायनाट झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग या या नियमांचे पालण करणे आवश्यक आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. होळी दहन कार्यक्रमाला रात्री 10 वाजेपर्यंतच परवानगी. डीजे लावण्यास पूर्णपणे बंदी आहे. डीजे लावल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. जोरात लाऊड स्पीकर लावल्यास कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर मद्यपान करणाऱ्यांवर विशेष नजर असणार आहे. त्याचबरोबर महिलांसोबत बीभत्स वर्तन केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.
काय आहे राज्य सरकारची नियमावली?
– होळी दहन कार्यक्रमाला रात्री 10 वाजेपर्यंतच परवानगी.
– डीजे लावल्यास कायदेशीर बंदी, नियमभंग गेल्यास कठोर कारवाई.
– मद्यपान आणि बीभत्स वर्तन करणाऱ्यांवर बारीक नजर असणार, कारवाईचे निर्देश.
– सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. लाऊड स्पीकर मोठ्या आवाजात लावू नये.
– धुलिवंदनाच्या दिवशी कोणालाही जबरदस्तीने रंग लावू नये.
– पाणी आणि रंगाचे फुगे फेकण्यावर बंदी.
– कोणत्याही जाती, धर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये.