चालू आर्थिक वर्ष अवघ्या काही दिवसात संपणार आहे. मार्च महिना हा आर्थिक वर्षांचा शेवटचा महिना आहे. त्यामुळे सर्वच शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये महत्त्वाची कामे पार पाडण्यासाठी धावपळ सुरु आहे. सर्वसामान्यांच्यादृष्टीने देखील मार्च महिना महत्त्वाचा असून या महिन्याअखेर बँकेशी संबधीत तसेच इतर कामे पूर्ण करावी लागतात. अन्यथा आर्थिक नुकसान सहन करावे लागते. नुकसान टाकळण्यासाठी 31 मार्च 2022 अखेरपर्यंत बँकेसंबंधी कोणती कामे पूर्ण करावी, या संबधी आपण जाणून घेऊया…
केवायसी करा अपडेट
बँकिंग सुविधेचा लाभ घेण्यासाठी खातेधारकांना केवायसी अपडेट करणे आवश्यक असते. केवायसी अपडेट करण्याची 31 मार्च शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही 31 मार्चपर्यंत केवायसी अपडेट करू शकतात. केवायसी कागदपत्रांमध्ये रहिवासी पुरावा, अपडेट पॅन आणि आधार कार्डासह इतर महत्त्वाच्या कागदपत्रांचा समावेश असतो. 31 मार्चपर्यंत केवायसी अपडेट न केल्यास तुम्हाला दंड लागू शकतो.
आधार आणि पॅन कार्ड लिंकिंग
बँकिंग व्यवहारासह इतर आर्थिक व्यवहारासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड महत्त्वाचे असते. आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक असणे गरजे आहे. तुम्ही जर तुमचे आधार आणि पॅन लिंक केले नसेल तर 31 मार्च आधी आधार आणि पॅन कार्ड लिंक करून घ्या. असे न केल्यास तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल. तुम्हाला TDS भरावा लागत तुमचे पॅन कार्ड रद्द देखील होऊ शकते. यासह इतर बँकिंग सुविधांचा लाभ घेण्यास तुम्हाला अडचणी येऊ शकता. त्यामुळे 31 मार्च आधी आधार आणि पॅन कार्ड लिंक करून घ्या.