अखेर शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागला आहे. जागतिक शेअर बाजारात (Stock Market) तेजीचे संकेत मिळत आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचे पहायला मिळाले. आज शेअर बाजार सुरू होताच पहिल्याच सत्राध्ये सेंन्सेक्स तब्बल 900 अकांनी वाढला. तर दुसरीकडे निफ्टीमध्ये (Nifty) देखील वाढ होऊन निफ्टी 17200 च्या पुढे गेला. बँक, आटो, बांधकाम या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. बुधवारी अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याज दर 0. 25 टक्क्यांनी वाढवले आहेत. अमेरिकेतील वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र याचा आशियाई शेअरबाजारावर सकारात्मक परिणाम झाल्यचे पहालयला मिळत असून, भारतीय शेअर बाजारत आज तेजीचे वातावरण आहे. सेन्सेंक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झाल्याने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मंदीचे वातावरण असल्यामुळे त्यांना मोठा तोटा सहन करावा लागला होता. सलग दोन दिवस शेअर बाजारात तेजी राहिल्याने गुंतवणुकदारांचा तब्बल 7.5 लाख कोटींचा फायदा झाला आहे.
जागतिक घडामोडी झपाट्याने बदलत आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता प्रस्तावावर चर्चा सुरू झाली आहे. चालू आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमती देखील कमी झाल्या आहेत. दुसरीकडे अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वांचा सकारात्मक परिणाम हा शेअर बाजारावर होताना दिसत असून, आज शेअर बाजार सुरू होताच सेंन्सेक्सने 900 अकांची उसळी घेतली. निफ्टीमध्ये देखील वाढ झाली आहे. हा गुंतवणूकदारांसाठी मोठा दिलासा माणण्यात येत आहे.