Sunday, December 22, 2024
Homeबिजनेसमुकेश अंबानींचा जगातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश, अदानींच्या संपत्तीत विक्रमी वाढ

मुकेश अंबानींचा जगातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश, अदानींच्या संपत्तीत विक्रमी वाढ

ताजी बातमी ऑनलाइन टीम

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा पुन्हा एकदा जगातील पहिल्या दहा सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश झाला आहे. मुकेश अंबानी हे एकमेव भारतीय आहेत की ज्यांचा या यादीमध्ये समावेश झाला आहे. Hurun Global Rich List 2022 मध्ये मुकेश अंबानी हे नवव्या स्थानी आहेत. मात्र दुसरीकडे संपत्तीच्या वाढीमध्ये गौवतम अदानी (Gowtam Adani) आघाडीवर असून, त्यांच्या संपत्तीमध्ये दररोज कोट्यावधी रुपयांची वाढ होत आहे.

हुरुनच्या वतीने नुकतीच जगातील टॉप टेन श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये भारतातून केवळ मुकेश अंबानी यांचा समावेश झाला आहे. ‘हुरुन’ (Hurun) कडून प्राप्त आकडेवारीनुसार मुकेश अंबांनी यांची एकूण संपत्ती 103 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास भारतीय चलनामध्ये 7,812 अब्ज डॉलर इतकी आहे. गेल्या एक वर्षामध्ये त्यांच्या संपत्तीत 20 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत तर जगातील 9 व्या नंबरचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

अदानींच्या संपत्तीमध्ये वाढ
दरम्यान दुसरीकडे या लिस्टमध्ये गौतम अदानी यांचा देखील समावेश आहे. मात्र ते या यादीतील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तीमध्ये स्थान मिळू शकलेले नाहीत. ते बाराव्या स्थानी आहेत. ‘हुरुन’कडून प्राप्त आकडेवारीनुसार अदानी यांच्या संपत्तीमध्ये झपाट्याने वाढ होत असून, संपत्ती वाढीच्या बाबतीत अदानी यांनी अंबानींना देखील मागे सोडले आहे. त्यांच्या संपत्तीमध्ये दररोज कोट्यावधी रुपयांची भर पडत आहे. बिझनेस टुडेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या एका वर्षात मुकेश अंबानी यांची संपत्ती तब्बल 49 अब्ज डॉलरने वाढली आहे. त्यांच्या संपत्तीत दिवसाला 857 कोटी रुपयांची भर पडत आहे.

एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
हुरुनच्या वतीने Global Rich List 2022 प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत जगातील सर्वात श्रीमंत दहा व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये टेस्लाचे संस्थापक आणि सीईओ एलन मस्क हे प्रथम क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 205 अब्ज डॉलर इतकी आहे. एलन मस्क यांच्या नंतर जेफ बेजोस हे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून, त्यांची एकूण संपत्ती 188 अब्ज डॉलर इतकी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -