ताजी बातमी ऑनलाइन टीम
आज राज्यात धुलिवंदनाचा उत्साह दिसून येत आहे. मागील दोन वर्षांपासून सर्वच सणांवर(Festival) निर्बंध असल्याने कोणतेही सण साजरे होऊ शकले नाहीत. यंदा मात्र करोनाचे प्रमाण कमी झाल्याने महाराष्ट्रात अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
आज 18 तारखेला धुलिवंदनाचा सण(Festival) निर्बंधमुक्त साजरा केला जात आहे. धुळवडीवर राज्य सरकारचे कुठलेही निर्बंध नाहीत मात्र, या सणाच्या निमित्ताने गृहखात्याने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
करोना अजूनही पूर्णपणे संपलेला नसल्याने मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. सध्या करोनाचे प्रमाण कमी झाल्याने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. काल होळीचा सण महाराष्ट्रात साजरा केला गेला. निर्बंध हटवल्याने होळीच्या सणाचा सर्वत्र उत्साह पाहायला मिळाला. राज्यातील विविध भागांमध्ये आपापल्या परंपरांनुसार होळी साजरी करण्यात आली.
मार्गदर्शक सूचना व नवी नियमावली
– कोविड संक्रमणामुळे हा सण(Festival) शक्यतो गर्दी न करता कोविड अनुरूप वर्तणूक नियमांचे पालन करून साजरा करण्यात यावा.
-एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येते. परंतु यंदाची होळी साधेपणाने साजरी करावी, असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं.
-होळी, शिमग्यानिमित्त विशेष करून कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी देखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात.
– तसेच गर्दी न होण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी.
-कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे पालन करावे
मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गरजेचं



