धरणगुती ते जयसिगपूर या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने या मार्गावर वर्दळ वाढली आहे. हा रस्ता अरुंद असल्यामुळे दोन वाहने ये जा करण्यास अडथळा निर्माण होत असल्याने या मार्गाची रुंदी वाढवण्याची मागणी ग्रामस्थांतुन होत आहे. धरणगुती जयंसिगपूर हा रस्ता केवळ दहा फुटाचा असल्याने अरुंद असा झाला आहे. दोन्ही बाजूला रस्ता तुटला असून या रस्त्यावरुन दोन वाहने जात नाहीत. त्यामुळे वारंवार अपघात होत असून या मार्गावर प्रवास करताना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूची रुंदी वाढून रस्त्याची रुंदीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांतुन होत आहे. धरणगुती ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभाग या कामात त्वरित लक्ष घालून रस्ता रुंदीकरणं करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -