एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, तर दुसरीचा विनयभंग करणाऱ्या कबड्डी प्रशिक्षकाला कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. कबड्डी प्रशिक्षकाला जन्मठेप आणि तीन लाख दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर सातत्याने लैंगिक अत्याचार करुन तिच्यावर मातृत्व लादले, तर आणखी एका मुलीचा विनयभंग केल्याचा प्रशिक्षकावर आरोप आहे. अकोला जिल्ह्यात 2018 मध्ये हा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही.डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने गुरुवारी कबड्डी प्रशिक्षकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
अल्पवयीन मुलीने 20 जुलै 2018 रोजी अकोल्यातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होत. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, तर दुसरीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला होता.
कबड्डी प्रशिक्षकाला जन्मठेप आणि तीन लाख दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीवर सातत्याने लैंगिक अत्याचार करुन तिच्यावर मातृत्व लादल्याचं समोर आलं होतं. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही.डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने गुरुवारी कबड्डी प्रशिक्षकाला शिक्षा सुनावली.