Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञानAirtel Postpaid Plan: एअरटेलचा भन्नाट प्लान ! एकाच रिचार्जमध्ये तिघांना मिळणार 'हे'...

Airtel Postpaid Plan: एअरटेलचा भन्नाट प्लान ! एकाच रिचार्जमध्ये तिघांना मिळणार ‘हे’ फायदे

मोबाईल युजर्सना रिचार्जच्या वाढलेल्या किंमतीमुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. देशातील सर्व खासगी दूरसंचार कंपनींनी रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढविल्या आहेत. त्यात पोस्टपेड कनेक्शन महाग झाले आहे. अशात तुम्हाला देखील वाढलेले रिचार्ज करणे परवडत नसेल. तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट प्लॅन आणला आहे. स्वस्त अशा या प्लॅनमध्ये एका रिचार्जमध्ये घरातील 3 सदस्यांना डेटा, कॉलिंग,ओटीटीसह इतर लाभ मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या प्लॅन विषयी…

999 रुपयांचा प्लॅन –
देशातील टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित कारण्यासाठी विविध ऑफर्स देत असतात. पोस्टपेडच्या तुलनेत प्रीपेड रिचार्जसाठी जास्त ऑफर्स असतात. पोस्टपेड कनेक्शन महाग असल्याने अनेक युजर्स घेत नाहीत. अशातच एअरटेलने 999 रुपयांचा जबरदस्त पोस्टपेड प्लॅन ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. या मंथली रेंटल प्लॅनमध्ये देशातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात येत आहे. यासह दररोज 100 एसएमएस, दर महिन्याला 100 GB डेटा यासह अतिरिक्त बेनिफिट्स देखील मिळतील. यात Amazon Prime, Airtel Xstream, Secure आणि Disney + hotstar चे सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी दिले जात आहे.

200 GB डेटा रोलओव्हरची सुविधा –
एयरटेलचा 999 रुपयांचा हा प्लॅन एक फॅमिली प्लॅन आहे. यामध्ये एक प्रायमरी आणि दुसरा ऍड-ऑन कनेक्शन दिले जाते. प्रायमरी कनेक्शनला 100 GB डेटा तर इतर दोन ऍड-ऑन कनेक्शनला 30-30 GB डेटा वापरण्यासाठी मिळतो. त्यानुसार एकूण 160 GB डेटा वापरण्यास मिळतो. ऍड-ऑन कनेक्शनला स्ट्रीमिंग बेनिफिट्ससह अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील दिली जाते. या प्लॅनमध्ये 200 GB पर्यंत डेटा रोलओव्हरची सुविधा देखील असून डेटा संपल्यानंतर युजर्सला प्रति एमबीसाठी 2 पैसे मोजावे लागतील. असा हा प्लॅन आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -