सासूच्या मृत्यूनंतर सासऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरची पेन्शन मिळावी म्हणून सूनेने केलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. कराड तालुक्यातील उत्तर पार्ले येथील मुलींच्या शासकीय वस्तीगृहाच्या महिला गृहपाल हिला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. रत्नमाला रामदास जाधव असे लाच स्विकारणाया गृहपाल महिलेचे नाव आहे.
लापलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे सासुबाई यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सेवानिवृत्तीनंतरची पेन्शन सासऱ्यांना मिळवून देण्याकरता गेल्या होत्या. कराड तालुक्यातील उत्तर पार्ले येथील बीसी इबीसी मुलींच्या शासकीय वस्तीगृहाच्या गृहपाल रत्नमाला रामदास जाधव यांनी 20 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा रचला. यामध्ये गृहपाल रत्नमाला जाधव हिला 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परिक्षेत्र पुणेचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, संभाजी काटकर, तुषार भोसले, महिला अंमलदार श्रद्धा माने, शितल सपकाळ यांनी कारवाई केली.