Sunday, February 23, 2025
Homeब्रेकिंगदारूच्या नशेत घरात घुसून महिलेची छेड काढणा-या बेवड्याला बेदम चोप

दारूच्या नशेत घरात घुसून महिलेची छेड काढणा-या बेवड्याला बेदम चोप

ताजी बातमी ऑनलाईन टीम
नालासोपारा:- दारूच्या नशेत घरात घुसून महिलेची छेड काढणा-या बेवड्याला बेदम चोप देत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.



नालासोपारा पूर्व संतोषभूवन पेट्रोल पंप च्या पाठीमागील बावशेत पाडा रोडवरील चाळीतील आज दुपारी 12 च्या सुमारास ची ही घटना आहे..

बेवाड्याने विवाहित महिलेची साडी ओडून घट्ट पकडून ठेवली होती. महिलेने साडी सोडून घेण्याचा प्रयत्न केला पण तरीही बेवडा काही सोडत नाही.. तेव्हा आजूबाजूचे लहान मूल, मुली, शेजारी यांनी त्याला खाली पाडून, चप्पल, लाथा बुक्या, झाडून बेदम चोप देऊन महिलेची सुटका करून घेतली आहे..

या घटनेमुळे चाळ, झोपडपट्टी मधील महिला किती असुरक्षित असून, बेवाड्याचा कसा सामना करावा लागत आहे हे समोर आले आहे..

या बेवड्याना आळा घालण्यासाठी पोलीस काय कारवाही करतात की त्यांना मोकाट सोडतात हे पाहणे गरजेचे आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -