Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रधक्कादायक : रसवंती यंत्रात पदर अडकला, 40 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

धक्कादायक : रसवंती यंत्रात पदर अडकला, 40 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

रसवंती यंत्रात पदर अडकून महिलेला प्राण गमवावे लागले. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. संबंधित महिला नांदेडच्या कौठा भागात ऊसाचा रस काढून विक्री करते. यावेळी तिच्या साडीचा पदर (Saree) रसवंती यंत्रात अडकून हा प्रकार घडला. दुर्गा खोंड असं या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चाळीस वर्षीय महिलेचं नाव आहे. ती मूळ हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आसेगाव इथली रहिवाशी होती. मात्र रसवंती गृहात ऊसाचा रस विकून उदरनिर्वाह करण्यासाठी ती हिंगोलीहून नांदेडला आली होती. रसवंती यंत्रात पदर अडकून अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

साडीचा पदर ऊसाचा रस काढण्याच्या मशिनमध्ये अडकून महिलेचा मृत्यू झाला. नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलं आहे. संबंधित महिला नांदेडच्या कौठा भागात ऊसाचा रस काढून विक्री करते. यावेळी तिच्या साडीचा पदर रसवंती यंत्रात अडकून हा प्रकार घडला.

दुर्गा खोंड असं या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 40 वर्षीय महिलेचं नाव आहे. ती मूळ हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आसेगाव येथील रहिवासी आहे. रसवंती गृहात ऊसाचा रस विकून उदरनिर्वाह करण्यासाठी ती हिंगोलीहून नांदेडला आली होती. रसवंती यंत्रात पदर अडकून महिलेला प्राण गमवावे लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -