Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्‍हापूर : सावकाराच्या दहशतीला कंटाळून पाचगावमधील हॉटेल व्यावसायिकाची आत्‍महत्‍या, ७५ हजारांच्या कर्जापोटी...

कोल्‍हापूर : सावकाराच्या दहशतीला कंटाळून पाचगावमधील हॉटेल व्यावसायिकाची आत्‍महत्‍या, ७५ हजारांच्या कर्जापोटी उकळले अडीच लाख

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राजेंद्रनगर येथील खासगी सावकाराच्या दहशतीला कंटाळून पाचगाव ( ता करवीर) येथील हॉटेल व्यावसायिक शैलेश शिवाजी जठार ( वय ४0 , रा. रायगड कॉलनी ) यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्‍यांची पत्नी ज्योती शैलेश जठार ( रा. रायगडकॉलनी ) यांनी खासगी सावकार संजय कटके (रा. राजेंद्रनगर) यांच्याविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात रविवारी फिर्याद दिली.



2008 पासून वसुलीसाठी तगादा
फिर्यादीमध्‍ये म्‍हटलं आहे की, हॉटेल व्यावसायिक शैलेश जठार यांनी २००८ मध्ये सावकाराकडून ७५ हजार रुपये बिनव्याजी घेतले होते. सात महिन्यांनी १० टक्के व्याजाची आकारणी केली. वसुलीसाठी तगादा सुरू झाला. हॉटेलमध्ये येऊन धमकी देण्याचा प्रकार घडू लागले. वेळोवेळी दोन लाख पन्नास हजाराची परतफेड करण्यात आली. त्यानंतरही मुद्दल वसुलीसाठी तगादा सुरु होता. सावकारांच्या दहशतीला कंटाळून पती शैलेश शिवाजी जठार यांनी गळफास लावून घेवून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


सावकाराकडून वसुलीचा तगादा आणि दहशतीला कंटाळून व्यवसायिकांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली चर्चा होती. आज रविवारी सकाळी शैलेश यांच्‍या पत्नी व अन्य कुटुंबीयांनी करवीर पोलिस ठाण्यात धाव घेऊन सावकार विरुद्ध फिर्याद दिली. शैलेश यांच्‍या खिशात दोन चिठ्‍्या आढळून आल्‍या. दहशतीला कंटाळून जीवन संपवत आहे, असे त्‍यांनी त्‍यामध्‍ये लिहिले आहे.

आत्महत्येची चित्रफीत ताब्यात
आत्महत्या करण्यापूर्वी शैलेश जठार यांनी मोबाईल कॅमेरामध्ये चित्रीकरण केले आहे. स्‍टुलवर उभा राहून त्‍यांनी स्वतः दोरीने गळफास घेतल्याची दिसून येते. त्‍यांच्‍या संभाषणाचा व्हिडिओ रेकॉर्डिंगही आढळून आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -