Monday, July 28, 2025
Homeकोल्हापूरबाळूमामांचा भंडारा २८ मार्चपासून

बाळूमामांचा भंडारा २८ मार्चपासून

कोरोना महामारीमुळे तब्बल दोन वर्षानंतर आदमापूर ता. भुदरगड येथील बाळूमामा देवस्थानचा वार्षिक भंडारा उत्सव व अमावस्या यात्रा मंगळवार, दि. २२ मार्च ते शनिवार, दि. २ एप्रिलअखेर होत आहे. या पार्श्वभूमीवर उत्सवासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. यात्रा नियोजनाबाबत बाळूमामा मंदिरात देवस्थान समिती, प्रशासकीय अधिकारी, व्यापारी व ग्रामस्थांची बैठक झाली. बाळूमामांचा वार्षिक भंडारा उत्सव तसेच हरिनाम सप्ताहाचा दि. २२ मार्च रोजी प्रारंभ, दि. २८ रोजी जागर मुख्य दिवस, दि. २९ रोजी महाप्रसाद होणार आहे.

या दोन दिवशी तीन राज्यांतून येणाऱ्या सुमारे ३ लाख भाविकांसाठी नियोजन केले आहे, तर दि. ३० रोजी पालखी सोहळा, १ एप्रिल रोजी अमावस्या व शनिवारी गुढीपाडवा असल्याने व शनिवारी गुढीपाडवा असल्याने १० दिवस हा सोहळा होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -