Saturday, July 26, 2025
Homeमहाराष्ट्रCylinder Blast : गॅस एजन्सीमधे मध्यरात्रीच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट, 4 जण भाजले

Cylinder Blast : गॅस एजन्सीमधे मध्यरात्रीच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट, 4 जण भाजले

सिलेडरचा स्फोट होऊन 4 कामगार जखमी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे जिल्ह्यात एका चाळीतील भारत गॅस एजन्सीमध्ये ही घटना घडली. रणजित सिंग असं मालकाचं नाव आहे. रविवारी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला. कळवा पूर्व परिसरातील आनंद विहार बिल्डिंग मागे शिवशक्ती नगरात ही घटना घडली. दुखापतग्रस्त कामगारांना कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सिलेंडरचा स्फोट होऊन चौघे कामगार जखमी झाल्याची घटना ठाण्यात समोर आली आहे. रविवारी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास कळव्यातील एका चाळीतील भारत गॅस एजन्सीमध्ये ही घटना घडली.

कळवा पूर्व परिसरातील आनंद विहार बिल्डिंगमागे शिवशक्ती नगरात ही घटना घडली. दुखापतग्रस्त कामगारांना कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व कामगार 80 ते 90 टक्के भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनास्थळी कळवा पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी 1-रेस्क्यू वाहनसह उपस्थित होते. परिस्थिती नियंत्रणात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -