Monday, December 23, 2024
Homeराजकीय घडामोडीराष्ट्रवादीचे नेते हे संजय राऊत यांना भेटणार, महाविकास आघाडीतील गटबाजी संपवण्याचे आवाहन

राष्ट्रवादीचे नेते हे संजय राऊत यांना भेटणार, महाविकास आघाडीतील गटबाजी संपवण्याचे आवाहन

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नागपूर दौऱ्यामुळे शिवसैनिकांचा आत्मविश्वास वाढलाय. सेनेच्या संघटन बांधणीसाठी राऊतांचा हा नागपूर दौरा आहे. पण संजय राऊतांच्या या दौऱ्यामुळे स्थानिक शिवसैनिकांना सोबतच महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या आशाही पल्लवीत झाल्यात. संजय राऊत यांच्या नागपूर दौऱ्याने महाविकास आघाडीला बळ येईल. अशी आशा करत नागपुरात महाविकास आघाडीतील गटबाजी संपवावी. आगामी नागपूर महापालिका निवडणूक तिन्ही पक्षाने एकत्र लढवावी. या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नागपूर अध्यक्ष दुनेश्वर पेठे  हे संजय राऊत यांची भेट घेणार आहेत.

शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी संपर्क प्रमुखांच्या कार्यालयातील भेटीगाठींचा कार्यक्रम रद्द करून पदाधिकाऱ्यांच्या सर्व बैठका रविभवन येथे घेण्याचे ठरविलंय. राऊतांचा हा निर्णय शिवसेना संपर्क प्रमुखांना एकप्रकारचे धक्का असल्याचे मानला जातोय. आतापर्यंत नागपुरातील गणेशपेठ शिवसेनाभवन सोडून पक्षाच्या सर्व बैठका संपर्क प्रमुख आ. दुष्यंत चतुर्वेदी यांच्याच कार्यालयात व्हायच्या. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. शिवसेनेला खासगी मालमत्ता केल्याचा आरोप केला जात होता. याची तक्रार मुंबईतील नेत्यांकडे करण्यात आली.

सर्व महत्त्वाच्या बैठका आणि स्थानिक पातळीवर धोरणात्मक निर्णय घेताना शिवसेना भवनचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतरही परिस्थिती फारशी बदलली नव्हती. आता संजय राऊत यांचा कार्यक्रम आखताना महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे आणि किशोर कुमेरिया यांच्याकडे असलेल्या विधानसभेचा आढावा घेण्यासाठी संपर्क प्रमुखांच्या कार्यालयातच बैठका लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे पुन्हा नाराजी सुरू झाली होती. त्यामुळे संजय राऊत यांनी संपर्क प्रमुखांच्या घरी भोजन आणि कार्यालयाला भेट हा कार्यक्रम कायम ठेवला. बैठका मात्र रविभवनच्या सभागृहात घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आज शिवसेनेच्या बैठका रवी भवनात होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -