Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरKolhapur : आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली कोल्हापुरात तरुणींचा सौदा, आंटीला अटक, तिघींची सुटका

Kolhapur : आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली कोल्हापुरात तरुणींचा सौदा, आंटीला अटक, तिघींची सुटका

कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिसांनी  मोठी कारवाई करत शहरातील उच्चभ्रु परिसरात सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे. आयुर्वेदीक मसाज पार्लरच्या नावाखाली तरुणींच्या शरीराचा सौदा करणाऱ्या महिलेसह दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर्समध्ये पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे. पोलिसांनी तीन पीडित तरुणींची सुटका केली आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा झालेल्या या कारवाईमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर्समध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटबाबत गोपनिय माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी शाहुपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

शहरातील महालक्ष्मी चेंबर्सच्या दुसऱ्या मजल्यावर दृष्टी आयुर्वेद पंचकर्म अँड बॉडी केअर सेंटरच्या खाली आरोपी महिलेने कुंटणखाना सुरू केला होता. या ठिकाणी पीडित तरुणींना आपल्या जाळ्यात अडकून आरोपी महिला त्यांच्या शरीराचा सौदा करत होती, अशी तक्रार पोलिसांत दाखल झाली होती. गोपनिय माहितीच्या आधारावर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी छापेमारी करत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. दृष्टी आयुर्वेद पंचकर्म अँड बॉडी केअर सेंटरच्या संचालक आणि मुख्य आरोपी चित्रकला कुरणे हिच्यासह दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तसेच पोलिसांनी तीन पीडित तरुणींची वेश्या व्यवसायाच्या दलदलीतून सुटका केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -