कागल तालुक्यातील सोनाळी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनाळी ग्रामस्थांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. या हल्ल्यामध्ये दहा जण जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. वरद पाटील खून प्रकरणातील संशयित पुन्हा गावात आल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले. आक्रमक ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली. या घटनेत पोलिसांसोबतच वरद पाटील याचे नातेवाईक देखील गंभीर जखमी झाले आहेत, 18 ऑगस्ट 2021 ला वरद पाटील यांच्या हत्येचा प्रकार समोर आला होता.
त्यानंतर या प्रकरणातील संशयीत मारुती वैद्य याला गावात न येऊ देण्याचा निर्णय ग्रामस्थानी घेतला होता. मात्र तरी देखील या हत्याकांडातील संशयीत आरोपी मारुती वैद्य हा गावात आल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, 18 ऑगस्ट 2021 ला वरद पाटील यांच्या हत्येचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर या खूनातील संशयित आरोपी मारुती वैद्य याला गावात न येऊ देण्याचा निर्णय सोनाळी ग्रामस्थांनी घेतला होता. मात्र मारुती वैद्य पुन्हा गावात आल्याने ग्रामस्थांचा राग अनावर झाला. रागाच्या भरात ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत पोलिसांसह वरद पाटील यांचे नातेवाईक देखील जखमी झाले आहेत. पोलिसांच्या हाताला, तसेच डोक्याला आणि डोळ्याला इजा झाली आहे.
पोलिसांवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर सोनाळी गावात तणावपूर्ण शांतता आहे. संतप्त ग्रामस्थांकडून मंगळवारी रात्री पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेमध्ये दहा जण जखमी झाले आहेत. मारूती वैद्य गावात आल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला, संतापाच्या भरात दगडफेक झाली, घटनेचा तपास सुरू आहे अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.