Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रThe Kashmir Files च्या शो दरम्यान गोंधळ; भगवी शाल घालून प्रवेश नाकारल्याने...

The Kashmir Files च्या शो दरम्यान गोंधळ; भगवी शाल घालून प्रवेश नाकारल्याने घोषणाबाजी

नाशिकमध्ये बुधवारी द काश्मीर फाइल्स चित्रपटाच्या शो दरम्यान पीव्हीआर सिनेमामध्ये गोंधळ झाला. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावणरण होते. एका महिला प्रेक्षकाला भगवी शाल घालून चित्रपटगृहात प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे महिला प्रेक्षक जोरदार आक्रमक झाल्या. त्यांनी स्वतः सुरक्षारक्षकांना जाब विचारला. यावेळी इतर महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, काही वेळात हे प्रकरण परस्पर सामंजस्याने मिटवण्यात आले. दुसरीकडे दोनच दिवसांपूर्वी असाच एक प्रकार आदिलाबादमध्ये घडला होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात एक प्रेक्षक पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत होता. त्याला इतर प्रेक्षकांनी बदडून काढल्याची घटना घडली होती. मात्र, याची सत्यता अजून पटलेली नाही. त्यातच नाशिकमधला हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता या चित्रपटाच्या शोने विनाकारण पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे.

नाशिकमधील सुप्रसिद्ध अशा कॉलेजरोडवरील पीव्हीआर सिनेमा चित्रपटगृहात बुधवारी द काश्मीर फाइल्स चित्रपटाचा शो खास महिलांसाठी आयोजित केला होता. या शोसाठी महिलांनी तुफान गर्दी केली होती. मात्र, तितक्यात एक महिला भगवी शाल परिधान करून आली. या महिलेला चित्रपटगृहात जाण्यास सुरक्षारक्षकांनी नकार दिला. त्यामुळे महिलेने कारण विचारले. महिला आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची झाली. या प्रकाराने तिथे उपस्थित असलेल्या महिलांही आक्रमक झाल्या. त्यामुळे गोंधळ वाढला. महिलांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. काही काळ वातावरण तापले होते. मात्र, सामंजस्याने हे प्रकरण मिटवण्यात आले. या प्रकरणी पोलिसांत काही तक्रार नोंदवण्यात आली नाही.

द काश्मीर फाइल्स हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करतोय. रोज एक विक्रम मोडतो आहे. चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल होत आहे. त्यात अनेक पालक आपल्या लहान मुलांना चित्रपट दाखवायला घेऊन येत आहेत. मात्र, हा चित्रपट विशेष म्हणजे हा चित्रपट ए ग्रेडचा असल्याने तो 18 वर्षांचे वय असलेल्यांनाच पाहायला परवानगी आहे. त्यामुळे अनेक पालकांना आपल्या मुलांना एक तरी घराकडे वापस पाठवून द्यावे लागत आहे किंवा सर्वांनाच घरचा रस्ता धरावा लागत आहे. दुसरीकडे या चित्रपटावरून दोन गट पडलेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटामुळे इतक्या दिवस दाबून ठेवलेला खरा इतिहास समोर आल्याचे म्हटले आहे. मात्र, विरोधकांनी हा चित्रपट एकतर्फी बनवल्याचा आरोप केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -