Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगबँकेची कामं दोन दिवसात करा पूर्ण, शनिवारपासून सलग 4 दिवस बँका राहणार...

बँकेची कामं दोन दिवसात करा पूर्ण, शनिवारपासून सलग 4 दिवस बँका राहणार बंद!

बँकेशीसंबंधित (Bank) तुमची जर काही महत्वाची कामं असतील तर येत्या दोन दिवसांमध्येच पूर्ण करुन घ्या. कारण सलग चार दिवस बँका बंद (Bank Closed) राहणार आहेत. जर तुमची कामं दोन दिवसांत पूर्ण नाही झाली तर तुम्हाला बुधवारपर्यंत थांबावे लागेल. 26 मार्च ते 29 मार्चपर्यंत बँका बंद राहणार आहेत. बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप (Bank Workers Strike) पुरकारला आहे. तर 26 मार्चला चौथा शनिवार आणि 27 मार्चला रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. तर सोमवार आणि मंगळवार हा संपाचा दिवस असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत.

सार्वजनिक उद्योगांमधील खासगीकरण (Privatization of Public Enterprises) आणि नवा कामगार कायदा (New Labor Act) याविरोधात भारतीय मजदूर संघ वगळता सर्व मध्यवर्ती कामगार संघटना, कर्मचारी संघटना, उद्योग तसेच बँक, विमा उद्योगातील कर्मचारी संघटना आणि असंघटित क्षेत्रातील सर्व कामगार संघटनांनी 28 आणि 29 मार्च रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व औद्योगिक कामगारही या संपात सहभागी होणार आहेत. हा संप नवीन कामगार कायद्याच्या विरोधात आहे.

त्याचप्रमाणे सरकार सरसकट सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे खासगीकरण करू पाहत आहे, त्या विरोधात हा संप आहे. सार्वजनिक आणि खासगी उद्योगांमधून कायमस्वरूपी रिक्त जागा न भरता सरसकट कंत्राटी पद्धतीचा अवलंब केला जात आहे. यालाच विरोध करण्यासाठी त्याचप्रमाणे नवीन कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करावी या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

या संपामध्ये बँक कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. बँकांतील ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन (AIBEA), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन (AIBOA), बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया (BEFI)या तीन संघटना संपामध्ये सहभागी झाल्या आहेत. राज्यातील जवळपास पाच लाखांहून अधिक बँक कर्मचारी, अधिकारी या संपात सहभागी होणार आहेत.

या संपात बहुसंख्य बँक कर्मचारी आणि बँक अधिकाऱ्यांची ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी संघटना सहभागी होत असल्याने स्टेट बँक (State Bank) आणि इंडियन ओव्हरसीज बँका (Indian Overseas Banks) वगळता इतर सर्व बँकांचे कामकाज ठप्प असणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशनचे महासचिव देविदास तुळजापूरकर यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -