Wednesday, April 1, 2026
Homeमहाराष्ट्रसंशयाने घेतला जीव; कुजलेल्या मृतदेहाच्या गूढाचा ४८ तासांत उलगडा; प्रियकर मजुरानेच केला...

संशयाने घेतला जीव; कुजलेल्या मृतदेहाच्या गूढाचा ४८ तासांत उलगडा; प्रियकर मजुरानेच केला घात.

होळीच्या तिसऱ्या दिवशी नारा परिसरातील साई लेआऊट जवळ शेतामध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाने पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले होते. अखेर जरिपटका पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत घटनेचा उलगडा केला.

 

कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या महिला मृत्यू हा अनैसर्गिक असून तिचा खून झाल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासासून निष्पन्न झाले. चारित्र्याच्या संशयावरून पछाडलेल्या प्रियकर मजुरानेच हा खून करत तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे पोलिसांनी अखेर तपासासून स्पष्ट झाले.

 

राजेंद्र उर्फ रज्जू यादव (४५) रा. छपारा, मध्य प्रदेश असे या प्रियकर मजुराचे नाव आहे. रज्जूने होळीच्या दिवशी रात्रीच चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसी दासीया उईके (३५) हीची ओटीपोटीत लाथा बुक्यांनी मारहाण करत हत्या केली होती. ती मृत झाल्याचे लक्षात येताच रज्जूने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा पयत्न केला. अर्धवट कुजलेल्या अवस्थेत तिला शेतात सोडून देत रज्जूने पळ काढला होता. होळीच्या तीन दिवसांनंतर शेतमालक तळेकर तुरीचे खळे करण्यासाठी शेतात गेले असता त्यांना उग्र दर्प आला. कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह पाहून तळेकर यांनी त्वरीत जरिपटका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयोला पाठवला.

 

अवघ्या ४८ तासांत केला खुनाचा उलगडा

 

महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने पोलिसांकडे कसलाही सुगावा नव्हता. त्यामुळे तपासात आव्हान होते. दरम्यान शवविच्छेदन अहवालात महिलेशी आधी शारीरिक संबंध ठेवल्याचे स्पष्ट झाले. शिवाय ओटीपोटीत मारहाण झाल्याने गर्भाची पिशवी फुटून अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचेही निदान डॉक्टरांनी केले. दरम्यान घटना घडल्यापासून रज्जू फरार होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.

 

असा लागला छडा

 

जरिपटका ठाण्तील गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक आशिष मोरखडे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्लास्टर जोडण्याचे काम करणारा राजेंद्र उर्फ रज्जू यादव आणि दासिया उईके हे दोघेही एकत्र मजुरी करायचे. रज्जू हा पूर्वी गुड्डी नावाच्या महिलेसोबत रहात होता. दरम्यान त्याची दासीयाशी जवळीक वाढली. दोघेही एकत्र बसून मद्य प्राशन करायचे. दासिया नेहमी त्याच्या खोलीवर यायची.

 

होळीच्या दिवशी दोघेही सोनू पालठेल्याजवळ भेटले. दोघांनी खोलीवर येऊन मद्य प्राशन केले. रज्जू हा दासियाच्या चातित्र्यावर संशय घेत होता. त्यावरूनच होळीच्या दिवशीही दोघांमध्ये वाद झाला. यातून रज्जूने दासियाला ओटीपोटीत जबर मारहाण केली. गर्भपिशवी फाटून रक्तस्त्राव झाल्याने दासियाचा मृत्यू झाला. तपासाची एकेक कडी जोडत मोरखडे यांच्या पथकाने अखेर खुनाचा उलगडा करत रज्जूला सोमवारी रात्री मध्य प्रदेशातील छापरा येथून अटक केली. पोलिसांनी घेरताच रज्जूने दासियाच्या खुनाची कबुली दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -