केंद्रीय तपास यंत्रणा सुडाच्या भावनेनं कारवाई करत आहेत. ज्या पद्धतीनं ते कारवाई करत आहेत त्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकार करणार नाही, असं स्पष्टीकरण खासदार संजय राऊत यांनी दिलंय. महाराष्ट्राचं गृहमंत्रालय तर असं कधीच करणार नाही. महाराष्ट्राला चांगल्या नेत्यांची प्रतिष्ठा, परंपरा आहे. विरोधीपक्ष नेते कितीही बोंबलले की सुडाच्या कारवाया सुरू आहेत. तरी तसं आम्ही करणार नाही. जर आम्हाला सुडाच्या करायच्या असले तर आम्हाला केंद्रीय तपास यंत्रणांकडून प्रशिक्षण घ्यावं लागेल. आम्हाला त्याची आवश्यकता नाही, असंही त्यांनी सांगितलं. श्रीधर पाटणकर यांची एक संपती जप्त केल्याची माहिती मिळत आहे. पूर्ण माहिती मिळाली की बोलू, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले.
तेलाच्या किंमती वाढत आहे. काल संसदेत महागाईवर चर्चा झाली आणि सभागृह चालू दिलं नाही. आता निवडणुका संपल्या, हेच भाजपचं धोरण आहे. चाल आहे. लोक यात फसतात. देशात पुन्हा एकदा महागाईवर एक माहौल बनणार. खरी समस्या रशिया-युक्रेन, हिजाब, काश्मीर फाईल नाही, देशाची खरी समस्या बेरोजगारी आणि महागाई आहे. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर अनेक वेळा आमदारांना जेवायला बोलावलं जाते, ही परंपरा आहे. महाराष्ट्रात आणि बंगालमध्ये राज्यपाल दोन्ही सरकारवर निशाणा साधतात. आणखी राज्यात राज्यपाल आहे. आणखी इतर राज्यात ईडीचे कार्यालय असू शकतात. जिथे भाजपचं सरकार नाही तिथे राज्यपाल आम्हाला टार्गेट करतात. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. विदर्भात प्रतिनिधीत्व देण्याबाबत मुख्यमंत्री गांभीर्याने विचार करत आहे. विदर्भाला लवकरंच प्रतिनिधीत्त्व मिळेल, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.