Tuesday, December 24, 2024
Homeकोल्हापूरKolhapur : अजित पवार, फडणवीस, आदित्य ठाकरे यांच्या सभांचे नियोजन

Kolhapur : अजित पवार, फडणवीस, आदित्य ठाकरे यांच्या सभांचे नियोजन

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडी व भाजप यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत आता प्रचार सभांचा धुरळा उडणार आहे. त्यातून आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा धडाडणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे, पंकजा मुंडे आदींच्या प्रचार सभांचे नियोजन सुरू आहे.

मोठ्या सभांवर किंवा मेळाव्यांवर भर न देता कॉलनी, अपार्टमेंटमधील नागरिकांना भेटून प्रचार यंत्रणा राबविली जात आहे. महापालिकेच्या 53 प्रभागांत पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून, दोन्ही बाजूंचे बूथ पातळीवरचे कार्यकर्ते मतदारांना भेटून त्यांच्या स्थानिक अडचणी समजावून घेत त्या सोडविण्यावर भर देत आहेत.

शेवटच्या आठवड्यात प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने वरील नेत्यांबरोबरच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या सभा त्यांच्या उपलब्धतेनुसार घेण्यात येणार आहेत. भाजपच्या वतीने ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, चित्रा वाघ, पाशा पटेल यांच्या सभा घेण्याचे नियोजन सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -