Friday, March 14, 2025
Homeकोल्हापूरवृद्ध आई-वडिलांचा छळ; मुलासह सुनेवर गुन्हा

वृद्ध आई-वडिलांचा छळ; मुलासह सुनेवर गुन्हा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर : वृद्ध आई-वडिलांचा छळ करून त्यांना राहत्या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सांगरूळ येथील मुलासह सुनेविरुद्ध करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कृष्णात बाजीराव भोसले, कविता कृष्णात भोसले (रा. बिरोबाचा माळ, सांगरूळ) अशी त्यांची नावे आहेत.


श्रीमती लक्ष्मी बाजीराव भोसले यांनी फिर्याद दाखल केली. २०१३ ते २३ मार्च २०२२ या काळात वेळोवेळी ही घटना घडल्याचे म्हटले आहे. ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालनपोषण व कल्याण अधिनियम २००७ चे कलम २४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -