Saturday, November 9, 2024
Homeसांगलीमिरजेत पोलिसांवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न, परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण

मिरजेत पोलिसांवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न, परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण

मिरज/प्रतिनिधी
मिरज शहरातील हाडको कॉलनी येथे जबरी चोरी करणार्‍या गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे.जबरी चोरी प्रकरणात इरफान विजापुरे, आरबाज आणि एक अल्पवयीन तर पोलिसांवर हल्ला प्रकरणी इरफान विजापुरे व एका अल्पवयीन तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : इरफान विजापुरे व एक अल्पवयीन तरुण हाडको कॉलनीतील प्रतिभा पाथरुट यांच्या दुकानात गेले.

त्यांनी सिगारेटची मागणी केली. त्यावेळी त्यांनी सिगारेट नसल्याचे सांगितले. त्यानंतर संशयितांनी चॉकलेटची मागणी केली. त्यावेळी प्रतिभा पाथरुट यांनी पाच रुपये मागितले. यावेळी दोघांनी दुकानातील अंड्याचा ट्रे आणि चॉकलेटचा डबा रस्त्यावर फेकून दिला. इरफान हा रिक्षातून कोयता घेवून येवून दुकानातील एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. यावेळी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी कापून टाकण्याची धमकी दिली.या घटनेची माहिती मिळताच हवालदार सचिन कुंभार व चंद्रकांत गायकवड घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी इरफान विजापुरे व अल्पवयीन मुलाने पोलिसांना “तुम्ही आमच्या मॅटरमध्ये पडू नका, मला ओळखत नाही का?” असे म्हणून इरफान हा हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत गायकवाड यांच्या अंगावर कोयता घेवून धावून गेला. ही माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक कचरे पथकासह घटनास्थळी गेले. त्यावेळी त्यांच्यासोबत देखील झटापट करून संशयितांनी शासकीय कामात अडथळा आणला. याबाबत जबरी चोरी प्रकरणी तिघांविरुद्ध व पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -