गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेले पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे सत्र पुन्हा सुरु झाले आहे. आज पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) वाढले आहेत. मागच्या सात दिवसातील ही सहावी दरवाढ आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवीन दर लागू केले आहेत. त्यानुसार पेट्रोलमध्ये 30 पैशांची तर डिझेलमध्ये 35 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत.
नवीन दरवाढीनुसार, मुंबईमध्ये पेट्रोलमध्ये प्रति लिटर 31 पैशांनी तर डिझेलमध्ये प्रति लिटर 37 पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीनुसार आज मुंबईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 114.18 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 98.46 रुपये झाली आहे. तर दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा दर 99.41 रुपये आणि डिझेलचा दर 90.77 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.