Wednesday, July 30, 2025
Homeब्रेकिंग1 एप्रिलपासून होणार ‘हे’ महत्वाचे बदल.. सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम..!

1 एप्रिलपासून होणार ‘हे’ महत्वाचे बदल.. सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम..!

मार्च तर आर्थिक वर्षातील अखेरचा महिना.. अर्थ क्षेत्रात काम करणाऱ्यांची या महिन्यात सर्वाधिक धांदल उडालेली असते. हा महिना नि पर्यायाने हे आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. नव्या आर्थिक वर्षात.. म्हणजेच येत्या 1 एप्रिलपासून आर्थिक क्षेत्रात कोणते बदल होतात, याची उत्सुकता लागलेली असेल..

‘पीएफ’ रकमेवर कर
येत्या 1 एप्रिलपासून मोदी सरकार नवा आयकर कायदा (Income tax law) लागू करणार आहे. त्यामुळे जूने ‘पीएफ’ खाते दोन भागांत विभागले जाऊ शकते. ‘ईपीएफ’ खात्यावरील 2.5 लाख रुपयांपर्यंत करमुक्त मर्यादा लागू आहे. त्याच्या व्याज उत्पन्नावर कर आकारला जाईल. सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘जीपीएफ’मध्ये करमुक्त मर्यादा वार्षिक 5 लाख रुपये आहे.

पोस्ट ऑफिस नियम
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि मुदत ठेव खात्यांवरील व्याजाचे पैसे फक्त बचत खात्यात उपलब्ध असतील. पोस्ट ऑफिसमधून व्याजाचे पैसे रोखीने घेता येणार नाही. बचत खाते लिंक केल्यावर, व्याजाचे पैसे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरित केले जातील.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीबाबत
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे पैसे चेक, बँक ड्राफ्ट किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे करता येणार नाहीत. म्युच्युअल फंड ट्रान्झॅक्शन एग्रीगेशन पोर्टल MF युटिलिटीज (MFU) 31 मार्चपासून चेक-डीडी इत्यादीद्वारे पेमेंट सुविधा बंद करणार आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूकीसाठी फक्त युपीआय (UPI) किंवा नेटबँकिंगद्वारे व्यवहार करता येईल.

अ‍ॅक्सिस व पीएनबीच्या नियमांत बदल
अ‍ॅक्सिस बँकेने बचत खात्यातील किमान शिल्लक ठेवण्याची मर्यादा 10 हजारांवरून 12 हजार रुपये केलीय. बँकेने मोफत रोख व्यवहारांची विहित मर्यादाही 4 विनामूल्य व्यवहार किंवा 1.5 लाख रुपये केली आहे. पंजाब नॅशनल बँकेने 4 एप्रिलपासून 10 लाख आणि त्यावरील धनादेशांची पडताळणी अनिवार्य केली आहे.

गॅस दरवाढीची शक्यता
महिन्याच्या पहिल्या दिवशीही गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल होऊ शकतो. सध्या पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमती वाढत आहेत, अशा परिस्थितीत एप्रिलमध्ये पुन्हा एकदा गॅस सिलिंडरच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

औषधांची किंमती वाढणार
1 एप्रिलपासून पेन किलर, अँटीबायोटिक्स, अँटी व्हायरससह अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार आहेत. शेड्यूल्ड औषधांसाठी 10 टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे 800 हून अधिक औषधांच्या किमती वाढणार आहेत.

घरखरेदी महागणार
केंद्र सरकार प्रथमच घरखरेदी करणाऱ्यांना कर सवलतीचा लाभ देणे बंद करणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात तशी घोषणा केली होती. त्यामुळे घरखरेदीसाठी अधिक कर भरावा लागेल.

ज्येष्ठांसाठी विशेष एफडी बंद
कोविड काळात विविध बॅंकांनी ज्येष्ठांसाठी विशेष एफडी योजना सुरू केली होती. या एफडीवर अधिक लाभ मिळत आहेत. मात्र, आता ही योजना बंद केली जाण्याची शक्यता आहे.

क्रिप्टोकरन्सीवर नवे नियम
सर्व व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता (VDA) किंवा क्रिप्टो मालमत्तेवर 30 टक्के कर आकारला जाणार असल्याची घोषणा केंद्राच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. हा नवा नियम 1 तारखेपासून लागू होऊ शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -