Tuesday, December 24, 2024
Homeराजकीय घडामोडी2024 ला बहुमताचं सरकार येणार, Devendra Fadnavis यांचा गोव्यातून मविआला इशारा

2024 ला बहुमताचं सरकार येणार, Devendra Fadnavis यांचा गोव्यातून मविआला इशारा

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज गोव्यात डॉ. प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. प्रमोद सावंत यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठी सोबत संवाद साधला. गोव्याला पुरोगामी आणि स्थिर विचाराचं सरकार मिळालंय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात 2024 मध्ये बहुमताचं भाजप सरकार येईल, असं म्हटलंय. देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातून महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्रातील भाजप नेते देखील यावेळी उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील देखील यावेळी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

मला अतिशय आनंद आहे की भाजपचं सरकार आलेलं आहे. नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय. अतिशय स्थिर, स्टेबल सरकार आलेलं आहे. गोव्यात स्थिर आणि पुरोगामी विचाराचं सरकार आलेलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. महाराष्ट्रात 2024 मध्ये भाजप बहुमताचं सरकार असेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना एवढं महत्व देण्याची गरज नाही, असं म्हटलंय. तर, तुम्हीही वेळ खराब करू नका आणि माझाही वेळ वाया घालवू नका, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. संजय राऊत यांना इतकं महत्त्व का देता ? ते सरकारचे प्रतिनिधी आहेत का?, विश्ववेत्ते आहेत का? संजय राऊत यांच्या विचारांना सुप्रीम कोर्टानं कचऱ्याच्या डब्यात फेकण्यासारखं म्हटलंय, तुम्ही माझा वेळ खराब करु नका आणि तुमचाही वेळ खराब करु नका, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -