Monday, July 28, 2025
Homeक्रीडाGTvLSG : लखनौला चौथा धक्का, मनीष पांडे बाद

GTvLSG : लखनौला चौथा धक्का, मनीष पांडे बाद

ताजी बातमी ऑनलाईन टीम

लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवे संघ आज आयपीएलमध्ये पहिला सामना खेळत आहेत. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे.

लखनौला चौथा धक्का
मोहम्मद शमीने लखनौ सुपर जायंट्सला तिसरा धक्का दिला आहे. मनीष पांडे ५ चेंडूंमध्ये ६ धावा करत तंबूत परतला आहे,

इवन लुइस बाद
इवन लुइस ९ चेंडूंमध्ये १० धावा करत तंबूत परतला.

क्विंटन डी काॅक बाद
मोहम्मद शमीने लखनौ सुपर जायंट्सला दुसरा धक्का दिला आहे. क्विंटन डी काॅकने ९ चेंडूमध्ये ७ धावा केल्या. सध्या क्रिजवर लुइस आणि मनिष पांडे टिकून आहेत.

कर्णधार राहुल बाद
सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर लखनौ सुपर जायंट्सला धक्का बसला. डावाच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीने लखनऊचा कर्णधार केएल राहुलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. शमीचा आऊट स्विंग बॉल राहुलच्या बॅटला लागला आणि यष्टिरक्षक मॅथ्यू वेडच्या हातात गेला.

LSG चा संघ
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), एविन लुईस, मनीष पांडे, दीपक हुडा, क्रुणाल पांड्या, मोहसिन खान, आयुष बदाउनी, दुष्मंथा चमिरा, रवी बिश्नोई, आवेश खान.

GT चा संघ
शुभमन गिल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), विजय शंकर, अभिनव मनोहर, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, लॉकी फर्ग्युसन, वरुण आरोन, मोहम्मद शमी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -