Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर: मतदानासाठी 12 एप्रिलला सार्वजनिक सुट्टी जाहीर

कोल्हापूर: मतदानासाठी 12 एप्रिलला सार्वजनिक सुट्टी जाहीर

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. 12 एप्रिल रोजी या जागेसाठी मतदान होणार आहे. यादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिवांनी राजपत्राद्वारे हे जाहीर केले आहे.


ही सार्वजनिक सुट्टी(Public holiday) मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदारसंघांच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू असेल. त्याचप्रमाणे केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू असेल.


काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक जाहीर झाली. निवडणूक जाहीर झाल्यापासून कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नेत्यांमध्ये रोज आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. महाविकास आघाडीबरोबरच भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे निकालानंतर आता सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -