Sunday, July 27, 2025
Homeसांगलीइस्लामपूर : नागाचा किस घेत स्टंट करणाऱ्या तरूणाचा वनविभागानं केला 'करेक्ट कार्यक्रम'

इस्लामपूर : नागाचा किस घेत स्टंट करणाऱ्या तरूणाचा वनविभागानं केला ‘करेक्ट कार्यक्रम’

नागाबरोबर जीवघेणा स्टंट करून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणे तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. वन्य जीव संरक्षण कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई करून वनविभागाने त्याला ताब्यात घेतले आहे. प्रदीप अशोक अडसुळे (वय २२, रा. बावची ता.वाळवा) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी, प्रदीप याने पकडलेल्या नागाबरोबर जीवघेणे स्टंट केले आहेत. फणा काढलेल्या नागाच्या समोर तोंड नेऊन त्याला स्पर्श करणे आदी प्रकारचे जीव धोक्यात घालून व्हिडिओ त्याने तयार केले आहेत. ते व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर टाकले.

याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर उपवनसंरक्षक विजय माने, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. अजित साजने यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक अमोल, निवास उगले भगवान गायकवाड यांच्या पथकाने प्रदीप याला ताब्यात घेतले आहे. प्रदीप अडसूळे याच्यावर वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -