Monday, December 23, 2024
Homeराजकीय घडामोडीमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्यांना अपघात

मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्यांना अपघात

शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. आज दौऱ्यावेळी त्यांच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्यांना अपघात झाल्याची घटना घडली. सुरक्षा ताफ्यातील दोन ते तीन गाड्यांना अपघात झाला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट नजीक हा अपघात झाला आहे. मंत्री आदित्य ठाकरेसिंधुदुर्गवरून रत्नागिरीला जात असताना खारेपाटण येथील हॉटेल मधुबन या ठिकाणी सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला यामध्ये मंत्री आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या मागे या गाड्या असताना, एका गाडीच्या चालकाने अचानक ब्रेक मारला.

त्यावेळी ताफ्यातील दोन ते तीन गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात झाला. मात्र, या अपघातात कोणी जखमी झाले नसले तरी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -