Tuesday, December 24, 2024
Homeक्रीडाIPL 2022 : धोनी-जडेजाला मोठा झटका!, कोट्यवधी रुपये जाणार वाया

IPL 2022 : धोनी-जडेजाला मोठा झटका!, कोट्यवधी रुपये जाणार वाया

आयपीएल २०२२ ला दणक्यात सुरुवात झाली आहे. आज (दि. २९) पाचवा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH vs RR) यांच्यात होणार आहे. याआधी चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) पहिला सामना काही खास झाला नाही. फलंदाजी किंवा गोलंदाजी या दोन्हीत संघाची कामगिरी निराशाजनक झाली. मात्र, पुढील सामन्यात संघ आपल्या कामगिरीनुसार खेळ दाखवेल, असा विश्वास कर्णधार रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) व्यक्त केला. पण दुसऱ्या सामन्याआधी चेन्नई सुपर किंग्ज (CSK)ला मोठा धक्का बसला आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा स्टार गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) अद्याप तंदुरुस्त झालेला नाही, असे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे त्याची आयपीएलमधील एन्ट्री खूप उशीरा होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. दीपक सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी असून तो तिथे फिटनेसवर काम करत आहे.

दीपक चहर (Deepak Chahar) लवकरच आयपीएलमध्ये सामील होईल अशी अपेक्षा होती, पण आता तसे होताना दिसत नाही. यापूर्वी मोईन अलीच्या रूपाने संघाला मोठा धक्का बसला होता. व्हिसाला उशीर झाल्याने तो संघात सामील होऊ शकला नाही.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दीपक चहरला दुखापत झाली होती. तेव्हापासून त्याच्या आयपीएलमध्ये खेळण्यावर प्रश्न उपस्थित झाले आहे. आयपीएल (IPL) कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर दीपकने ६३ सामन्यात ५९ विकेट घेतल्या आहेत. आता त्याचे उशिरा येणे चेन्नईसाठी धक्क्यापेक्षा कमी नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -