Saturday, March 15, 2025
Homeब्रेकिंगयंदा दहावी बारावीच्या परीक्षेचा निकाल रखडणार?

यंदा दहावी बारावीच्या परीक्षेचा निकाल रखडणार?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

बोर्डाची परीक्षा ऑनलाईन व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. असे असले तरी बोर्डाची परीक्षा (exams) ऑफलाइन पार पाडली आहे.परंतु अनेक शाळांनी उत्तर पत्रिका तपासणीच्या कामावर बहिष्कार टाकल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल रखडणार आहे.दहावी बारावीच्या बोर्डाची परीक्षा झाली असून आता विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत.


परंतु शाळांनी आदोलन केल्यामुळे त्यांना आणखी काळ वाट पहावी लागणार आहे असे दिसते. कायम विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांनी १०० टक्के अनुदान मिळावे या मागणीसाठी आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे अनेक विनाअनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका तपासणीविना पडून आहेत. कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने (exams) उत्तरपत्रिका तपासणी करण्यास नकार दिला आहे. तसेच आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत उत्तरपत्रिका तपासणार नाही अशी भूमिका या शाळेतील शिक्षकांनी घेतली आहे.

२४ फेब्रुवारी रोजी विनाअनुदानित शिक्षकांनी १०० टक्के अनुदानाची मागणी केली होती. तसेच शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सेवा संरक्षण मिळावी अशीही मागणी करण्यात आली होती. परंतु सरकारने शाळांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. उत्तरपत्रिकांचे गठ्ठेच्या गठ्ठे शाळेत धुळखात पडले आहेत.

शक्यतो मे महिनाअखेर किंवा जुनच्या पहिल्या आठवड्यात दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर होतात. जसे जसे पेपर होतात तसतसे शाळांमध्ये शिक्ष उत्तरपत्रिका तपासण्यास सुरूवात करतात. यंदाचे चित्र वेगळे आहे. दहावी बारावीची परीक्षा होऊनही विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासल्या नाहीत. त्यामुळे यंदा बोर्डाचे निकाल उशीरा लागतील असा अंदाज व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -