कोरोनाच्या काळात असे अनेक लोक आहेत जे यापूर्वी स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेत नव्हते ते देखील आर्थिक परिस्थिती खालावल्याने रेशन दुकानांतून स्वस्त धान्य घेऊ लागले आहेत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची मुदतवाढही आता सप्टेंबर 2022 पर्यंत सरकारने वाढवली आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कुटुंबातील सदस्य संख्येच्या आधारे सरकार देशातील नागरिकांना अत्यंत स्वस्त दरात रेशन देत असते. देशातील गरीब कुटुंबांना, आर्थिक परिस्थिती जेमतेम असणाऱ्या कुटुंबांना रेशनकार्डच्या प्रकारांनुसार ठरलेलं रेशन दिलं जातं.
गेल्या कित्येक महिन्यांपासून जर तुम्ही स्वस्त धान्य दुकानातुन धान्य घेतले नसेल तर तुमचंही रेशन कार्ड रद्द होऊ शकतं, यावर अनेक जिल्ह्यांत कार्यवाही करण्यात येत आहे. तुम्हाला हे माहीत असायला हवं की, रेशन कार्ड रद्द होण्यामागे त्या नागरिकाने मागील कमीत कमी सहा महिन्यांमध्ये रेशन कार्डवर धान्य घेतलेलं नसेल. तर नियमांनुसार त्याला स्वस्तात मिळणाऱ्या धान्याची गरज नाही किंवा तो व्यक्ती स्वस्त दरातील धान्य घेण्यास पात्र नाही असा त्याचा अर्थ होतो. प्रामुख्याने हे कारण असते. अशी अनेक प्रकरणे समोरदेखील आली आहेत. त्यामुळे सहा महिन्यांहून अधिक काळ धान्य न घेतलेल्या व्यक्तीचं रेशन कार्ड रद्द केलं जाईल.
माहितीनुसार, तुमचं रेशन कार्ड रद्द झालं असेल तर ते तुम्ही पुन्हा काही चुका सुधारण्यासाठी किंवा इतर योग्य कारणांसाठी अॅक्टिव्ह म्हणजेच पुन्हा याचा वापर करण्यासाठी सक्रिय देखील करू शकता. अशात जर तुमचं रेशन कार्ड रद्द अथवा बाद झालं असेल, तर तुम्ही भारतभर कुठेही AePDS रेशन कार्ड पोर्टलवर रद्द झालेलं Ration Card Active करू शकता. त्यासाठी पुढील काही स्टेप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील..
सर्वात आधी राज्य किंवा केंद्रीय AePDS पोर्टलवर जा.
▪️ आता ‘रेशन कार्ड करेक्शन’ हा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.
▪️ Ration Card Correction पेज वर तुमचा रेशन नंबर शोधण्यासाठी फॉर्म भरावा लागेल.
▪️ आता तुम्ही रेशन कार्ड (शिधापत्रिका) दुरुस्ती पृष्ठावर जा आणि तुमचा रेशन कार्ड क्रमांक शोधण्यासाठी फॉर्म भरा.
▪️ आता तुमच्या रेशन कार्ड च्या माहितीत काही चूक असल्यास ती दुरुस्त करा.
▪️ दुरुस्ती केल्यानंतर, स्थानिक PDS कार्यालयाला भेट द्या आणि अर्ज सबमिट करा.
▪️ जर तुमचा रेशन कार्ड सक्रिय करण्याचा अर्ज स्वीकारला गेला, तर तुमचे रद्द केलेले रेशन कार्ड पुन्हा सक्रिय केले जाईल.