Monday, July 28, 2025
Homeक्रीडाLSG vs CSK IPL 2022: CSK ला आज दीपक चाहरची आठवण आली...

LSG vs CSK IPL 2022: CSK ला आज दीपक चाहरची आठवण आली असेल, लखनौच्या इविन लुईसच्या बॅटमधून फोर, सिक्सचा पाऊस

ताजी बातमी ऑनलाइन टीम

लखनौ सुपर जायंट्सने आज स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. इविन लुईस (Evin Lewis) आणि आयुष बदोनी (Ayush Badoni) लखनौच्या विजयाचे हिरो ठरले. पण त्याची पायाभरणी केएल राहुल आणि क्विंटन डि कॉकच्या जोडीने केली. नाणेफेक जिंकून केएल राहुलने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. चेन्नईचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. रॉबिन उथाप्पा, मोईन अलीने ज्या पद्धतीने सुरुवात केली, ते पहाता केएल राहुलचा निर्णय चुकला असंच वाटलं. चेन्नई सुपर किंग्सने आज प्रथम फलंदाजी करताना 210 धावांचा डोंगर उभारला. लखनौ सुपर जायंट्सला हे लक्ष्य पार कठीण जाईल असं वाटलं होतं. पण लखनौने शेवटच्या षटकापर्यंत खेचल्या गेलेल्या या सामन्यात आरामात विजयी लक्ष्य गाठलं.


या’ दोघांनी केली विजयाची पायाभरणी
इविन लुईसच्या 23 चेंडूतील आक्रमक 55 धावा आणि आयुष बदोनीच्या नऊ चेंडूतील नाबाद 19 धावांच्या बळावर लखनौने विजय मिळवला. सलामीवीर केएल राहुल आणि क्विंटन डि कॉकने या विजयाची पायाभरणी केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. केएल राहुलने 40 धावा केल्या. सुरुवातीपासूनच डिकॉक आणि राहुलने आक्रमक फलंदाजी केली. डि कॉकने 45 चेंडूत 61 धावा केल्या. यात नऊ चौकार होते. त्यानंतर लुईसने 23 चेंडूत 55 धावा फटकावताना सहा चौकार आणि तीन षटकार लगावले. आयुष बदोनीने 9 चेंडूत 19 धावा केल्या. यात त्याने दोन षटकार लगावले.

एका षटकात 25 धावा तिथेच सामना फिरला
लखनौने चेन्नईवर विजय मिळवला, त्याचं प्रमुख कारण आहे चेन्नईची सुमार गोलंदाजी. चेन्नईचा आज सात गोलंदाज वापरले. पण त्यांचा एकही गोलंदाज प्रभावी वाटला नाही. शिवम दुबेला सामन्यातील 19 वे षटक दिले. पण त्याच षटकात लुईस-बदोनी जोडीने हल्लाबोल करुन 25 धावा वसूल केल्या. तिथेच लखनौचा विजय निश्चित झाला. खरंतर लखनौला विजयासाठी 12 चेंडूत 34 धावांची आवश्यकता होती. पण एकाच षटकात 25 धावा गेल्याने शेवटच्या षटकात नऊ धावा करणं फार कठीण नव्हतं.

चेन्नईची गोलंदाजीची बाजू किती कमकुवत आहे ते आज दिसून आलं. चेन्नईला आज दीपक चाहरची उणीव प्रकर्षाने जाणवली असेल. दीपक चाहर दुखापतग्रस्त आहे. चेन्नईचा एकही गोलंदाज लखनौच्या फलंदाजांना रोखू शकतो, असं वाटलं नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -