Saturday, March 15, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : बायकोला अमानुष मारहाण करून भररस्त्यावर विवस्त्र करण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : बायकोला अमानुष मारहाण करून भररस्त्यावर विवस्त्र करण्याचा प्रयत्न

कौटुंबिक वादातून पत्नीला अमानुष मारहाण करून भररस्त्यावर विवस्त्र करण्याची संतापजनक घटना येथील एका उच्चभू्र कॉलनी परिसरात घडली. विवाहितेने शाहूपुरी पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

लग्‍नानंतर किरकोळ मतभेदातून पतीकडून पत्नीचा शारीरिक, मानसिक छळ होत असे. बुधवारी रात्री महिला नोकरीवरून घरी आल्यानंतर तिला मुले दिसली नाहीत. तेव्हा तिने पतीसह सासरकडील मंडळींशी संपर्क साधला असता मुले घरी असल्याचे सांगण्यात आले.

मुलांना घरी नेण्यासाठी महिला सासरी येताच पतीने तू घरी का आलीस, अशी विचारणा करीत शिवीगाळ करून रस्त्यावरच विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. यावेळी नागरिकांनी पीडित महिलेची पतीच्या तावडीतून सुटका केली. पादत्राणाने चेहर्‍यावर, हातावर मारहाण करून जखमी केल्याचेही महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -