Wednesday, July 23, 2025
Homeब्रेकिंगधक्कादायक! पॉर्न अभिनेत्रीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करुन ठेवले फ्रिजमध्ये!

धक्कादायक! पॉर्न अभिनेत्रीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करुन ठेवले फ्रिजमध्ये!

एका प्रसिद्ध पॉर्न स्टारची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. कॅरोल माल्टेसी असे (Carol Maltesi) तिचे खरे नाव आहे. तर तिचे स्टेजवरील नाव Charlotte Angie असे आहे. इटलीत (Italy) ही भीषण घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर पीडितेच्या शरीराचे तुकडे करण्यात आले आणि तिचा मृतदेह एका गावातील कड्यावर फेकून देण्यात आला होता. २६ वर्षीय या पॉर्न अभिनेत्रीच्या (adult actress) हत्येप्रकरणी पोलिसांनी डेव्हिड फोंटाना नावाच्या ४३ वर्षीय बँकरला अटक केली आहे.

लोम्बार्डी प्रदेशातील पॅलाइन गावाजवळील एका कड्यावर अभिनेत्रीचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीवर निर्घुण हत्या, पुरावे नष्ट करणे आणि मृतदेह लपविण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. चौकशीदरम्यान बँकर असलेल्या आरोपीने अभिनेत्रीचा खून केल्याची कबुली दिली आहे. त्याने खून केल्यानंतर मृतदेह फ्रीझरमध्ये ठेवला आणि एक महिन्यानंतर तो कड्यावर फेकून दिल्याचीही कबुली पोलिसांसमोर दिली आहे.

एका वृतानुसार, मृत अभिनेत्री आणि तिचा शेजारी डेव्हिड फोंटाना हे एकमेकांना डेट करत होते. पण त्याचे हे नाते अधिक काळ टिकले नाही. दरम्यान, सदर अभिनेत्रीची हातोड्याने वार करून हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. खून केल्यानंतर अभिनेत्रीचा मृतदेहाचे तुकडे करण्यात आले आणि ते चार पोत्यांमध्ये भरण्यात आले होते. पण अभिनेत्रीच्या एका चाहत्याने मृतदेह ओळखला आणि त्यानंतर मृत अभिनेत्रीची ओळख उघड झाली. ११ ते १३ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या एका महोत्सवात अभिनेत्री दिसली नव्हती. त्यामुळे तिच्या चाहत्यांना संशय आला होता. यानंतर तिच्या एका चाहत्याने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर अभिनेत्रीच्या खुनाचा उलगडा झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -