Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : विद्यार्थ्याची आत्महत्या, शाळा अध्यक्ष, मुख्याध्यापकांवर गुन्हा

कोल्हापूर : विद्यार्थ्याची आत्महत्या, शाळा अध्यक्ष, मुख्याध्यापकांवर गुन्हा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथे आर्यन हेरंब बुडकर (वय 16) या विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष गणपत जनार्दन पाटील व मुख्याध्यापिका गीता गणपत पाटील यांच्यावर शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.


आर्यनला किरकोळ कारणावरून अपमानास्पद वागणूक, शिवीगाळ व शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिल्यामुळे त्याचे मानसिक खच्चीकरण झाले. त्यामुळे त्याने आत्महत्या केली. या आत्महत्येस गणपत पाटील व गीता पाटील हे जबाबदार आहेत, असा आरोप आर्यनचे आजोबा फिर्यादी रामचंद्र तुकाराम बुडकर यांनी केला आहे.


आर्यन हा नववीत शिकत होता.आर्यन शाळेतील हुशार विद्यार्थी होता. बुडकर कुटुंबाचा तो एकुलता मुलगा होता. शाळेमध्ये फुटबॉल खेळताना किरकोळ कारणावरून शाळेचे अध्यक्ष गणपत पाटील यांनी आर्यनला शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक देत शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली होती. यामध्ये आर्यनचे मानसिक खच्चीकरण झाल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -