ताजी बातमी ऑनलाईन टीम
भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या कोल्हापूर येथील प्रचार सभेत रविवारी (दि.४) अज्ञातांतकडून दगडफेक करण्यात आली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात चित्रा वाघ यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेदरम्यान हा प्रकार घडला. याबाबत चित्रा वाघ यांनी ट्विट करत दगडफेक करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.
भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या प्रचार सभेत झालेल्या दगडफेकीनंतर चित्रा वाघ यांनी ट्वीट केले. त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून ‘‘ वाह रे बहाद्दरांनो… समोर यायची हिम्मत नाही तर सभेत दगड मारता…आज संध्याकाळी भाजपा उत्तर कोल्हापूर उमेद्वार सत्यजीत कदम यांच्या प्रचारार्थ सभेत मी बोलत असताना तिथे दगडं मारण्यात आली… तुमची दहशत गुंड बलात्काऱ्यांवर दाखवा… असल्या थेरांना घाबरणारी चित्रा वाघ नाही हे लक्षातचं ठेवा..’’ असे प्रत्युत्तर दगड मारणाऱ्यांना चित्रा वाघ यांनी दिले आहे.