Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगकर्नाटकात वीजदरवाढीचा शॉक; इंधन, गॅस दरवाढीनंतर आणखी एक धक्‍का

कर्नाटकात वीजदरवाढीचा शॉक; इंधन, गॅस दरवाढीनंतर आणखी एक धक्‍का

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅसनंतर आता वीज दरवाढ करण्यात आली आहे. आधीच महागाईने त्रस्त असणार्‍या जनतेला आता वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने सोमवारी प्रति युनिट सरासरी 35 पैसे दरवाढीची घोषणा केली. ही दरवाढ 1 एप्रिलपासूनच लागू झाली आहे.

हेस्कॉमसह राज्यातील पाच वीज वितरण कंपन्यांनी विजेच्या दरात प्रतियुनिट 1.85 पैसे वाढ करण्याची मागणी केली होती. याबाबतचा प्रस्ताव गत वर्षअखेर वीज नियामक आयोगाकडे पाठवण्यात आला होता. त्यावर आयोगाने आक्षेप मागवले होते. विविध क्षेत्रांतील लोकांची बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर प्रति युनिट 35 पैसे दरवाढीची घोषणा केली.

इंधन दरवाढ व इतर कारणांमुळे वीज पुरवठा करण्यास अधिक खर्च येत आहे. हा अतिरिक्‍त खर्च भरून काढण्यासाठी दरवाढ अनिवार्य असल्याचे वीज वितरण कंपन्यांनी आयोगाला कळवले होते. पण, मांडलेल्या प्रस्तावाप्रमाणे दरवाढ शक्य नसून सरासरी प्रति युनिट 35 पैसे वाढ करणे शक्य असल्याचे आयोगाने कंपन्यांना कळवले होते. त्यानुसार दरवाढ जाहीर करण्यात आली.

गतवर्षीही वीज कंपन्यांनी प्रति युनिट 1.39 रुपये दरवाढीची मागणी आयोगाकडे केली होती. पण, आयोगाने प्रति युनिट 30 पैसे वाढ केली होती.

4.33 टक्के दरवाढ
वीज वितरण कंपन्यांनी प्रति युनिट 5 पैसे इंधन शुल्क आणि प्रति एच.पी./कि.वॉ./के.व्ही.साठी 10 रुपयांवरून 30 रुपये वाढ करण्याची मागणी केली होती. त्याला वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली. त्यामुळे प्रति युनिट सरासरी 35 पैसे वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत 4.33 टक्के इतकी ही दरवाढ आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -