Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगBIG BREAKING: ED ची मोठी कारवाई, शिवसेना खासदार संजय राऊत यांची कोट्यावधींची...

BIG BREAKING: ED ची मोठी कारवाई, शिवसेना खासदार संजय राऊत यांची कोट्यावधींची मालमत्ता जप्त

ताजी बातमी ऑनलाईन टीम
शिवसेना खासदार संजय राऊत (shivsena mp sanjay raut) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सक्तवसुली संचलनालयाने (enforcement directorate) अर्थात ED ने मोठी कारवाई केली आहे. खासदार संजय राऊत यांच्या मालकीची अलिबागमधील (Alibaug) कोट्यावधींची मालमत्ता ED ने जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. ED संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या मालमत्ता जप्त केली आहे. यात संजय राऊत यांच्या मालकीचे 8 भूखंड आणि दादरमधील एका फ्लॅटचा समावेश आहे


मिळालेली माहिती अशी की, ED ने संजय राऊत यांच्यावर गोरेगाव येथील 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी कारवाईचं शस्त्र उगारले आहे.

दुसरीकडे, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मालमत्ता जप्तीच्या कारावाईनंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देताना शिवसेनेवर खोचक निशाणा साधला आहे. सोमय्या म्हणाले, संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून ED च्या कारवाईतून स्वत: ला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, जे व्हायचं ते झालंच. संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीचे गैरव्यवहार चव्हाट्यावर आले आहेत. प्रकरणी संजय राऊंताविरुद्ध आणखी कारवाई होणार असल्याचे संकेत देखील किरीट सोमय्या यांनी दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -