युवा सेनेचा निश्चय दौरा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. त्याचाच दुसरा भाग म्हणून विदर्भात मेळावे आहेत. युवा सेनेचं काम चांगलं सुरु आहे. युवा सेनेची ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती युवा सेनेचे वरुण सरदेसाई यांनी नागपुरात दिली. शिवसेना कुणाची टीम आहे, असं मला वाटत नाही. शिवसेनेचे पक्ष प्रमुख मुख्यमंत्री आहेत. शिवसेना किंग मेकर नाही तर किंगच्या भूमिकेत आहे. संजय राऊत शिवसेनेची बुलंद तोफ आहे. महाविकास आघाडीला एकत्र आणण्यासाठी राऊत साहेब यांची महत्त्वाची भूमिका आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक हाक द्यावी. महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक, युवासैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊत यांच्या झालेली ईडीची (ED ) कारवाई सुड बुद्धीतून झाली. संजय राऊत यांचा गुन्हा काय? हे भाजपचे नेते सुद्धा सांगू शकणार नाही.
वरुण सरदेसाई म्हणाले, दीड महिने विधानसभा निवडणुकीनंतर संजय राऊत बोलले. त्यांच्या प्रयत्नांनी भाजपचे 105 आमदार घरी बसवले आणि सेनेचा मुख्यमंत्री बनवून दाखवला. हा राग आहे. हाच गुन्हा आहे का? गेले दोन अडीच वर्षे आपल्या कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी अशी वक्तव्य करतात. दर 15 दिवसांनी तारीख देतात. पाच वर्षे नाही तर पुढील 25 वर्षे शिवसेना सत्तेत दिसेल. आणि उद्धवजी मुख्यमंत्री दिसतील, असंही सरदेसाई यांनी सुनावले.