नागपुरात गेल्या काही दिवसांत रोज पेट्रोलचे दर रोज वाढतायत. 10 दिवसांत एक लिटर पेट्रोलवर 8 रुपयांपेक्षा जास्त दर वाढलेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसतोय. नागपुरात पेट्रोलचे (Petrol) दर 120 रुपयांवर पोहोचलेय. त्यामुळे 50 रुपयांपेक्षा कमी पेट्रोल मिळणार नाही, अशा पाट्या नागपुरातील काही पेट्रोल पंपवर लागल्यात. म्हणजे पेट्रोलचे दर वाढल्याने (Inflation) आता काही पेट्रोलपंपावर 50 रुपयांचं पेट्रोल देणे परवडत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालीय. देशात सर्वाधित महाग पेट्रोल परभणीत (Parbhani) आहे. परभणीत पेट्रोलचे दर 121 रुपये 34 पैसे, तर डिझेलचे दर 103 रुपये 95 पैसे प्रतिलीटर आहेत.
नागपुरात गेल्या चौदा दिवसांत बारा वेळा पेट्रोलची दरवाढ झाली. दरवाढीमुळं सामान्य व्यक्तीचा खिसा रिकामा होत आहे. केंद्र सरकार इंधन दरवाढीवर नियंत्रण आणत असल्यानं सामान्य जनता रोष व्यक्त करत आहे. सोमवार तेल कंपन्यांनी प्रत्येकी चाळीस पैसे पेट्रोलवर दरवाढ केली. या दरवाढीचे चटके बसत आहेत. दिल्लीतील सीएनजीची किंमत अडीच रुपयांनी महागली. त्यामुळं महागाईचा भडका चांगलाच उडत आहे. नागपुरात इंधन दरवाढीचा (Inflation) भडका उडालाय. 50 रुपयांपेक्षा कमी पेट्रोल मिळणार नाही, अशा पाट्या आता पेट्रोल पंपावर लागल्या आहेत. कारण नागपुरात पेट्रोलचा दर 120 रुपये प्रतीलीटरवर पोहचला. पेट्रोल महागल्याने सर्वसामान्यांना फटका बसतोय.