Monday, July 7, 2025
Homeमहाराष्ट्रCorona New Variant: धोका अद्याप टळलेला नाही! कोरोनाच्या नव्या व्हेरियन्टचे रुग्ण

Corona New Variant: धोका अद्याप टळलेला नाही! कोरोनाच्या नव्या व्हेरियन्टचे रुग्ण

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोनासंदर्भातील निर्बंध देखील हटवले आहे. मात्र धोका अजूनही टळलेला नाही. कोरोनाच्या नव्या व्हेरियन्टने मुंबईत प्रवेश केला आहे. मुंबईत आज कोरोना विषाणूच्या kappa आणि XE व्हेरिएन्टचे दोन रुग्ण आढळले आहेत. यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. विषाणूच्या जिनोम सिक्वेंसिंग टेस्ट केल्यानंतर या दोन नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत 230 नव्या कोविड रुग्णांची नोंद कऱण्यात आळी आहे. यातील 228 रुग्ण ओमायक्रॉनचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर एक रुग्ण ‘कापा’ आणि एक ‘एक्सई’व्हेरिएंटचा असल्याचे आढळले आहे. यापैकी 21 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी कोणालाही ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची किंवा आयसीयूमध्ये उपचार घेण्याची गरज भासली नसल्याचे सांगण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोरोना विषाणूच्या नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग टेस्ट केल्या जात आहेत. याअंतर्गत अकराव्या टप्प्यात मुंबईतील 230 कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. यातील 228 जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच दोन रुग्ण कोरोनाचा नवा उपप्रकार कोप्पा आणि एक्सईचे असल्याचा निष्कर्ष जाहीर करण्यात आला.

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा (Corona in China) प्रादुर्भाव सुरू झाला आहे. त्यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आयआयटी कानपूरने चौथ्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका अधिक (BMC) सतर्क झाली आहे. आयुक्त सुरेश काकाणी यांनी अद्याप जम्बो कोविड सेंटर बंद केले नसल्याची माहिती दिली आहे. ते म्हणाले, मुंबईतील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट झाली आहे. रिकव्हरी रेट देखील वाढला आहे. त्यामुळे शहरात बांधलेल्या एकूण 9 जम्बो कोविड केंद्रांपैकी 6 बंद करण्याचा विचार मुंबई महानगरपालिका करत आहे. परंतु अद्याप शहरात बांधलेले एकही कोविड केंद्र बंद झालेले नाही. टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी सातत्याने चर्चा सुरू आहे. परिस्थिती पाहून जम्बो कोविड सेंटर सुरू ठेवायचे की बंद करायचे याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -