मित्राच्या प्रेयसीला वेगवेगळे आमिष दाखवून लॉजवर नेऊन दोघांनी तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नागपुरात समोर आली. त्यानंतर तिला देहव्यापारात ढकलत तिच्या देहाचाही सौदा केला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या (Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Department) पाच आरोपींना अटक केलीय. विशाल उर्फ दत्तू दाभणे ऊर्फ खाटीक, सत्यजित ऊर्फ निखिल बांगड, सचिन इंगळे, आकाश ऊर्फ विक्की भोसले अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. अमित लोखंडे हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचही आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत. त्यांनी दहावीत असलेल्या मुलीला देहव्यवसाय (Prostitution) करून घेण्यासाठी नागपुरात आणल्याचे उघड झाले.
यातील मुख्य आरोपी विशाल कुख्यात आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाच्या 28 गुन्ह्यांची नोंद आहे. सचिनवरही गंभीर स्वरूपाचे 10 गुन्हे आहेत. विशालचा एक मित्र जवळच्या गावात राहतो. त्याच्या मैत्रिणीची विशालसोबत ओळख झाली. ती खाजगी काम करायची. या माध्यमातून तिची एका अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. विशालने या दोघींनाही नागपुरात नोकरी आणि पैशाचे आमिष दाखविले. आमिषाला बळी पडताच दोघींनाही नागपुरात आल्या. त्यांना काही दिवस विशालने आपल्या घरी ठेवले.
सत्यजित आणि सचिन यांनी मुलींना हुडकेश्वरातील लॉजवर नेऊन दोघांनी एकीवर बलात्कार केला तर दुसरीवरही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो मित्राच्या प्रेयसीसाठी ग्राहक शोधायला लागला. अशाप्रकारे दोन्ही मुलींना विशालने देहव्यापाराच्या दलदलीत लोटले. आरोपी आकाश आणि अमितने अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केला. त्यानंतर या प्रकरणाचा भंडाफोड झाला. अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी दिली.