ताजी बातमी ऑनलाईन टीम
उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरातील कुलरला साडेपाच वर्षीय चिमुकल्याचा खेळत असताना हात लागल्याने विजेचा शॉक लागून मृत्यु झाला. युग महेश जेंगठे असे बालकाचे नाव आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात घडली आहे.
हा चिमुकला संत गजानन महाराज मंदिर परिसरात वास्तव्यास आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरात कुलर सुरू केला होता. महेश जेंगठे ह्यांचा साडेपाच वर्षीय मुलगा युग हा नेहमी प्रमाणे अंगणात इतर मित्रांसोबत खेळत होता. खेळताना अचानक त्याचा हात सुरू असलेल्या कुलरला लागला. त्यानंतर त्याला विजेचा जोरदार शॉक बसला. यानंतर त्याचा जागीच मृत्यु झाला. त्याला तातडीने स्थानिक उपजिल्हा रूग्णालयात उपचारा करीता दाखल केले.
दरम्यान, चिमुकला युग हा येथील सेंट अँन्स हायस्कुलचा केजी 2 मध्ये शिकत होता. उन्हाळयाच्या सुट्टयामध्ये तो मागील महिनाभरापासून घरीच राहत होता. विजेच्या धक्याने चिमुकल्या युगचा मृत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.